सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
खालापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत म्हणून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची ओलख आहे.या ग्रामपंचायत हद्दीत जवलपास पन्नास हजारांच्या आसपास लोकसंख्या असून या ग्रामपंचायतींचे सरपंचासह अठरा सदस्य संख्या आहे.
दरम्यान आली आंबिवली येथील शिवमंदिराभोवताली प्रदक्षिणा करताना भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.यासाठी आली आंबिवली येथील नागरिकांनी शिवमंदिराभोवताली पेव्हर ब्लॉक रस्ता करुन मिळावा अशी मागणी माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याकडे केली होती.
यावेळी माजी सरपंच संदिप मुंढे यांनी जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद फंडातून आली आंबिवली शिवमंदिराभोवताली पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कामाचा भुमीपुजन करुन काम सुरू केले आहे.आषाढी एकादशी येण्याअगोदर शिवमंदिराभोवतालचा रस्ता भाविकांना प्रदक्षिणा करण्यासाठी मिळावा यासाठी माजी सरपंच संदिप मुंढे स्वता:हून लक्ष घालत आहेत.तसेच आली आंबिवली येथे मंदिराजवळच जिल्हा परिषद निधीतून रस्ता काॅक्रीटीकरणाचे काम रविवार पासुन सुरू होत असल्याचे माजी सरपंच संदिप मुंढे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच राकेश खारकर, सुभाष आहिर,अरुण गायकवाड, माजी उपसरपंच दत्ता शिंदे,सदस्य महैंद्रीकर, कृष्णा पांगत,शंकर भोईर,चिक्या भोईर,संदेश जाधव, मिलिंद कावडे, किरण खारकर,संतोष पाटील,चेतन जाधव आदींसह शिवभक्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत भुमिपुजन करत कामास सुरूवात करण्यात आली.








Be First to Comment