Press "Enter" to skip to content

महेश राठी यांची लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्ष पदी निवड

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

खालापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक लायन महेश राठी यांनी लायन्स क्लब खोपोलीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली.लोणावळा येथे काल पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात लायन रमेश पाटील यांच्या कडुन अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एमजेएफ लायन गिरीश मालपाणी यांनी महेश राठी यांना अध्यक्ष पदाची शपथ दिली.लायन मालपाणी यांनी महेश राठी यांच्या समवेत 2021-22 या वर्षासाठी लायन शिल्पा मोदी यांना सेक्रेटरी तर लायन अल्पेश शहा याना खजिनदार म्हणून शपथ दिली. तसेच संपुर्ण टीमला हे वर्ष लायन्स क्लब खोपोलीच्या इतिहासातील महत्वपूर्ण वर्षं आहे या जबाबदारीची जाणीव करून त्यांना पदगग्रहण शपथ दिली आणि येत्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नियमांचे काटेकोर पणे पालन करीत हा कार्यक्रम संपन्न झाला. खरे तर या वर्षी लायन्स क्लब खोपोलीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी क्लब सदस्यांची इच्छा होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचे भान राखत अतिशय साध्या पद्धतीने मोजक्याच उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मावळते अध्यक्ष रमेश पाटील यांना मागील वर्षी अनेक बंधने स्वीकारून सामाजिक कार्य करावे लागले, परंतु त्याही परिस्थितीत लायन्स आय केअर सेंटर,डायग्नोसीस सेंटर,स्किन चेक अप सेंटर अशी उल्लेखनीय कार्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली क्लबने पार पडली या सर्वाचे श्रेय लायन रमेश पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या सर्व क्लबच्या सहकार्यांना दिले तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष लायन महेश राठी यांना आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित अध्यक्ष लायन महेश राठी यांनी सुवर्ण महोत्सव वर्षासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केल्या बद्दल क्लबच्या सर्व सहकारी सदस्यांचे आभार व्यक्त केले आणि लायन्स क्लबच्या पन्नास वर्षाच्या परंपरेस साजेसे कार्य याही वर्षी त्यांच्या अध्यक्षते खाली पार पडेल असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात लायन्स डिस्ट्रिक्ट चे फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन मुकेश तनेजा यांनी सोळा प्रतिष्ठित व्यक्तींना लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या सदस्यत्वाची शपथ दिली आणि लायन महेश राठी आणि त्यांच्या नवनिर्वाचित टीमला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी खोपोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश जाखोटीया,सामाजिक कार्यकर्ते सौ.क्षमा आठवले,डॉ.घनश्याम आठवले,खालापूर नगरपंचायत माजी अध्यक्ष शिवानी जंगम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन नगेंद्र केजरीवाल आणि लायन सचिन बोराना यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन शिल्पा मोदी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.