सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कृषी, ग्रामीण विकास बँक व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग, शाखा नागोठणे यांच्या तर्फे ऐनघर ग्रामपंचायत मधील सभागृहात महिला बचत गटांसाठी आर्थिक साक्षरता अभियान मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमा अंतर्गत आर्थिक बचत म्हणजे काय? महिला आर्थिक सक्षम कशा प्रकारे होतील? याचबरोबर माहिलांनी व्यवसाय करणे का गरजेचे आहे? या व अशा अनेक विषयांवर बँक मॅनेजर प्रमोदीनी पाटील व बँक एनेमेटर प्रतिभा वाडेकर यांनी मार्गदर्शन केले तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश कातकरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि आरडीसी बँक ही रायगड जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट,विद्यार्थी यांना आर्थिक पुरवठा करुन दिलासा देणारी सर्वात जवळची बँक असुन शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज देते.तसेच महिला बचत गट यांना आर्थिक पुरवठा करुन देणारी बँक आहे.तसेच इतर अनेक मान्यवरांनी सर्व बचत गटातील महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बँक मॅनेजर प्रमोदिनी पाटील, नाबार्ड ईशक्ती बँक एनेमेटर प्रतिभा वाडेकर,गुरव साहेब, बँक सखी वर्षां जांबेकर,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डोबले , सदस्या कल्याणी मोहिते, ग्रामविकास अधिकारी राजु श्रीराम डेरे, ,तसेच ऐनघर पंचक्रोशीतील महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक सखी वर्षां जांबेकर यांनी केले तर महिला बचत गटांनी जास्तीत जास्त फळ झाडे लावल्याने आर्थिक बचततीत वाढ होऊन महिला वर्ग आर्थिक सक्षम होऊ शकतो याबरोबर आपल्या आर्थिक बचती बरोबरच महिला वर्गाने आपल्या मुलांनाही सुसंकृत करावे ही काळाची गरज आहे असे बोलून दिनेश कातकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.








Be First to Comment