Press "Enter" to skip to content

उषाताई कांबळे यांच्याकडून महिलांना मोफत मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

जनतेला जिवनावश्यक वस्तू कुवतीबाहेरच्या वाटू लागल्या आहेत. त्यातच कोरोनासारखी महामारी,निसर्गात होणा-या बदलामुले उदभवलेली परिस्थिती यामुळे हातावर पोट भरणा-यांची बिकट अवस्था झाली आहे.जिवनावश्यक वस्तूंचे भाव भरमसाठ वाढल्याने गरीब आणि मध्यमवर्गीयांना एक वेळ उपवास करण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने “कधी येणार अच्छे दिन”याची सर्वसामान्य माणूस वाट पाहत आहे.परंतु कोरोनाकाळात होत्याचे नव्हतं झाल्याने कुटूंबाची गुजराण करण्यासाठी काहीतरी करावेच लागेल.यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा महिलाप्रमुख उषाताई पांडुरंग कांबळे यांच्यावतीने वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील वरोसे येथे महिलांना मोफत मेणबत्ती प्रशिक्षण देण्यात आले.

महिलांना घरबसल्या कमाईंचे साधन मिळावे यासाठी उषाताई कांबळे यांनी महिलावर्गांला मेणबत्ती प्रशिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली आहे.गरिबीचे संकट आल्यावर शांत न बसता काहीतरी व्यवसाय करावा, त्यातून नक्कीच फायदा होईल असे उषाताई कांबळे यांनी महिलावर्गांला आवाहन करीत बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.