Press "Enter" to skip to content

शिवसंपर्क अभियान अंतर्गत नवघर जिल्हा परिषद गणाच्या सभा संपन्न

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने “शिवसंपर्क अभियान” शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नवघर जिल्हा परिषदेच्या नवघर व भेंडखळ पंचायत समिती गणाच्या सभा अनुक्रमे पागोटे व नवीन शेवा येथे संपन्न झाल्या.

सदर सभेमध्ये जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी माझे गाव, कोरोना मुक्त गाव अभियान प्रत्येक शाखाप्रमुखाने त्यांच्या गावात राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोरोना लसीकरण, कोरोना काळात देण्यात येणारे मोफत रेशन, आधार कार्ड, रिक्षा चालकांचे रजिस्ट्रेशन , सरकारी योजनांचा लाभ अशा अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करून गाव तेथे शिवसेना शाखा व घर तेथे शिवसैनिक ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

त्याचप्रमाणे माजी जिल्हाप्रमुख व जेएन्पीटी विश्वस्त दिनेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसंपर्क अभियानाचे महत्व पटवून देऊन संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनीही आपल्या मनोगतातून शिवसंपर्क अभियाना बद्दल माहिती सांगितली व विमानतळ नामकरणाच्या बाबतीत बीजेपी करत असलेल्या राजकारणावर चौफेर टिका केली.

यावेळी तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका संघटक के. एम्. घरत यांनी केले तर आयोजन विभाग प्रमुख रजनीकांत पाटील व के.एम्. घरत यांनी केले होते.

कार्यक्रमा प्रसंगी उरण नगरपालिकेचे गटनेते गणेश शिंदे, उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील, कामगार नेते महादेव घरत, मा.महालण विभाग प्रमुख मधुकरशेठ ठाकूर , ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर , श्री रवी शेठ वाजेकर , उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, युवा सेनेचे निशांत घरत त्याचप्रमाणे शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, महेंद्र पाटील, नंदू चौगुले, राकेश ठाकूर, सुरज भोईर, सचिन म्हात्रे, रविंद्र कृष्णा भोईर, अरूण पाटील, कमलाकर कोळी, मनोज शेवेकर, विकास पाटील, सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, पंकज सुतार, उदय दर्णे, रविंद्र पाटील, प्रतिक पाटील, करण पाटील, परशुराम ठाकूर तसेच माजी सरपंच श्रीमती लीलावती भोईर, महिला शाखा संघटिका वैशाली सुतार, उपसंघटीका मयुरी घरत, प्रमिला घरत, मनिषा घरत व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.