Press "Enter" to skip to content

डोळवी औद्योगिक क्षेत्रासाठी भुसंपादनाला शेतक-यांचा विरोध

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भुसंपदन रद्द करा : शेतक-यांचे लाक्षणिक उपोषण

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

 

औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पेण तालुक्यातील डोळवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव – गडब , डोळवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत  परिसरातील जमिन संपादित करण्यात येणार आहे या भुसंपादनाला येथील शेतक-यांनी विरोध दर्शविला असुन हे भुसंपादन रद्द करावे या मागणीसाठी या परिसरातील शेतक-यांनी पेण उपविभागिय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

यावेळी संजय पाटील, सुनिल कोठेकर, दिनेश म्हात्रे,सुशिल कोठेकर. प्रविण म्हात्रे. आदि शेतकरी उपोषणास बसले होते.

औद्योगिक विकास महामंडळामार्फत डोळवी औद्यौगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील वावे, कोळवे, बेणेघाट, डोळवी,  खारढोंबी, खारचिर्बी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारजांभेळा, खारघाट या गावातील 2120 हेक्टर जमिन संपादित करण्यात येणार आहे या मध्ये 165 हेक्टर सरकारी जमिन ,जेएसडब्लु कंपणीचे 411 हेक्टर जमिन तर खाजगी शेतक-यांची 1537 हेक्टर जमिन संपादित करण्यात येणार . या भुसंपादना बाबत  येथील शेतक-यांना औद्यौगिक विकास 1961चा कलम 32( 2 ) अन्वये व्यक्तिगत नोटीस शासनाने बजावल्या आहेत. सदर भुसंपादनाला शेतक-यांनी विरोध दर्शविला आहे. या भुसंपादनामुळे शेतक-यांचे उपजिविकेचे साधन नष्ट होणार आहे.

गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर अनेकांची घरे देखील या भुसंपादनात बाधित होणार आहेत.अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत आसल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे त्यामुळे त्यामुळे या भुसंपादनाला शेतक-यांचा विरोध आहे. हे भुसंपादन रद्द करावे या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले.

या उपोषण स्थळी आमदार रवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, नरेश गांवड, माजी जिल्हापरिषद सदस्य सुरेश म्हात्रे, संजय जांभळे, मनसेचे पेण तालुका अध्यक्ष अंकुश म्हात्रे, काराव- गडब सरपंच अर्पणा कोठेकर वडखळ सरपंच राजेश मोकल, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे, सचिन तांबोळी, परशुराम म्हात्रे आदिनी पांठीबा दिला.

तर या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी व उपविभागिय अधिकारी विठ्ठळ ईनामदार यांच्या सोबत कार्यालयात बैठक झाली या बैठकीत शेतक-यानी जमीनीची मोजणी करु नये व हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली असता या क्षेत्रातील सरककारी जमिन व जेएसडब्लु कंपणीच्या जमिनीची मोजणी केली जाईल शेतक-याच्या जमिनिची मोजणी तृर्त स्थगित करण्यात येईल असे उपविभागिय अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी सांगितले. यावेळी आमदार रवि पाटील, तहसिलदार अरुणा जाधव आदि सह शेतक-यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.