सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव, अंनिस वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत रायगड जिल्ह्याची नविन कार्यकारणी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनिस रायगड जिल्हाध्यक्षपदी नागोठणे येथील सामाजिक कार्यकर्ते, लायन्स क्लबचे पदाधिकारी विवेक सुभेकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अनिस जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या बैठकीत मुक्ताताई दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते अनिसची रायगड जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उर्वरित पदाधिकाऱ्यांत जिल्हा उपाध्यक्षपदी पेण येथील प्रा. डॉ. शिवसजन कान्हेकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी नागोठणे येथील मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव पदी संदेश गायकवाड, युवा विभाग, अमित गवळे पाली, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रा. डॉ. आलम शेख – पेण, महिला विभाग सुनिता देशमुख – नागोठणे, बुवाबाजी संघर्ष अमित निंबाळकर – पाली, वार्तापत्र विभाग रवींद्र कान्हेकर – रोहा, सोशल मीडिया विभाग – संकल्प गायकवाड – पेण, जिल्ह्यातील राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊ सावंत (माणगाव ), मिना मोरे ( पेण)-
निलेश घरत (अलिबाग) आदींची निवड करून जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी दिली.
या बैठकीस दिनेश शिर्के, विजया चव्हाण, सतीश पोरे, श्रीनिवास गडकरी, एन. जे. पाटील, नंदकिशोर राक्षे, मंदाकिनी गायकवाड, पांडुरंग घरत, नरेश पाटील, चंद्रहास पाटील, प्रमोद खांडेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मुक्ताताई दाभोळकर यांनी अभिनंदन केले.








Be First to Comment