Press "Enter" to skip to content

सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका रंजना म्हसकर यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील मौजे बाळसई येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सौ रंजना म्हसकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समई त्या ६५ वर्षाच्या होत्या रंजना म्हसकर यांचे अचानक निधन झाल्याने म्हसकर कुटूंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे तर परिसरात शोककळा निर्माण झाली आहे .

ऐनघर ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल म्हसकर यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका रंजना म्हसकर यांनी येथील अंगणवाडीत जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षे अखंडपणे सेवा करत येथील लहानग्यां मुलांना शाळेत प्रवेश देत त्यांना चांगलं शिक्षण व विविध कला सादर करून मुलांना शाळेत बसण्याची आवड निर्माण करून देत असत अनेक मुलांवर चांगले संस्कार केले ग्रा.पं. चे माजी सदस्य विठ्ठल म्हसकर यांच्या पत्नी व वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला रोहा सुधागड तालुक्यात नावाजलेले मृदुन्गचार्य ह.भ.प.संजय महाराज म्हसकर यांच्या मातोश्री होत आपल्या कुटूंबाची जबाबदारी पती बरोबर संसार करत अंगणवाडी सेविका म्हणून चांगली सेवा करत शिक्षिका म्हणून चांगले समाजात व परिसरात योगदान लाभले मुलांना चांगले शिक्षण देऊन आज अतिशय चांगले कुटूंब सांभाळत आपापली जबादारी निभावत आहेत .

त्यांच्या पश्चात पती चार मुले सुना नातवंडे असा मोठा मित्रपरिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवार दि १६ जुलै व उत्तरकार्य तेरावे सोमवार दि १९ जुलै रोजी त्यांच्या राहत्या निवास्थांनी मौजे बाळसई येथे संपन्न होणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांकडून कळविण्यात येत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.