Press "Enter" to skip to content

सुतारवाडी येथील डॉक्टर गुलाबराव पाटील यांचे कोरोनाने निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

सुतारवाडी येथील डॉक्टर गुलाबराव भास्कर पाटील यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी मुंबई येथील दवाखान्यात दि,१२ जुलै २०२१ रोजी अखेरचा घेतला.

त्यांचे मुळ गाव खानदेशा मधील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निमझरी हे होते. ते १९८५ साली सुतारवाडी येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी दवाखाना उघडला. कुडली विभागातील ते प्रथम डॉक्टर होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाने ग्रासले होते. त्यामुळे अधिक उपचारासाठी प्रथम ॲपोलो हॉस्पिटल नंतर अंधेरी येथील हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांनी कोरोना काळात कोलाड व सुतारवाडी परिसरात लोकांवर न डगमगता उपचार केले. ते अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, जावई असा परिवार आहे. डॉक्टर गुलाबराव पाटील यांच्या निधनाने सुतारवाडी दशक्रोशिमध्ये दुःख व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.