सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे खुर्द येथे खासदार निधी 7 लाख व 1 लाख 83 हजार रुपये नगरपरिषद फंड असे 8 लाख 83 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे व 3 लाख खासदार निधी व 3 लाख 31 हजार रुपये असे 6 लाख 31 हजार रुपये खर्चून दहिवली मधील गुरव आळी मध्ये उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
पालक व्यायाम शाळा व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका भारती पालकर, संचिता पाटील, विशाखा जिनगरे, नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेवक बळवंत घुमरे, राहुल डाळिंबकर,संकेत भासे, प्राची डेरवणकर, स्वामींनी मांजरे, पुष्पा दगडे, माजी नगरसेवक संतोष पाटील, भालचंद्र जोशी, कृष्णा घाडगे, अरुणा वायकर, बिनीता घुमरे, निलेश घरत, कामिनी दांडेकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला उदय शिंदे आणि चैतन्य मळीवाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना, ‘या मतदार संघात 250 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त निधी आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. नजीकच्या काळात शिवसृष्टी, प्रति आळंदी, भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून त्यामुळे कर्जत नगरीची शोभा वाढेल. आपण मुंबई प्राधिकरणाच्या माध्यमातून 50 कोटी निधी सुद्धा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षात विकासाची गंगा आपण आणली आहे. कोरोनाचा काळ असल्याने आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’ असे स्पष्ट केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात, ‘केंद्र सरकारचे पाहिजे तितके सहकार्य महाराष्ट्राला मिळत नाही तरीही मुखमंत्री उद्धव ठाकरे एखादे मॉडेल ठरावे असे काम याकाळात करीत आहेत. राज्याकडून शिवसेनेच्या खासदारांना प्रत्येकी 7 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी कर्जत मतदार संघासाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी देणार आहे.’ असे जाहीर केले. याप्रसंगी केतन जोशी, किशोर कदम, प्रसाद डेरवणकर, अरुण वायकर, प्रशांत दिघे, दिलीप बामणे, राजू पितळे आदी उपस्थित होते.








Be First to Comment