Press "Enter" to skip to content

शिवसंपर्क अभियानाची माथेरानमध्ये पक्ष प्रवेशाने धडाक्यात सुरुवात

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिलेदार शिवसेनेत डेरेदाखल

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

माथेरान नगरपरिषदेत एकहाती सत्ता स्थापन असलेल्या शिवसेनेवर निस्सीम प्रेम असणाऱ्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्यात काँग्रेस पक्षाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आपल्या गोटात ही मंडळी समाविष्ट झाली आहेत.

यामध्ये नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले चर्मकार समाजाचे माजी खजिनदार सचिन विलास काळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. तर भाजपचे
भारतीय जनता पक्ष, सेल अध्यक्ष माथेरान शहर तथा संत रोहिदास युवा महासंघ संपूर्ण भारत, कर्जत तालुका अध्यक्ष अक्षय सोनवणे आणि काजल अक्षय सोनवणे हे पतीपत्नी सुध्दा शिवसेनेत स्वेच्छेने दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्मकार समाजाचे माजी सह खजिनदार सुभाष काळे आणि महेश काळे या शिलेदारांनी सुध्दा शिवसेनेत स्वेच्छेने प्रवेश केला आहे आहे.

त्यामुळे माथेरानच्या युवा कार्यकर्त्यांची आजही शिवसेनेलाच पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.शिवसंपर्क अभियानाची माथेरानमध्ये पक्ष प्रवेशाने
धडाक्यात सुरुवात झालेली दिसून येत आहे. आगामी निवडणुकीचे सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकलेले सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.

या सर्व नवोदित कार्यकर्त्यांनी
शिवसेनेच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,संपर्क प्रमुख,गटनेते प्रसाद भाई सावंत ,माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,आणि तमाम शिवसैनिक महिला आघाडी यांच्या साक्षीने या अभियानाच्या शुभ मुहूर्तावर पक्षप्रवेश करून शिवसेनेची आगामी निवडणुकीची ताकद आणखीन बळकट झालेली दिसत आहे.

संत रोहिदास नगर हा भाग पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता परंतु २०१६ च्या निवडणुकीत प्रसाद सावंत यांच्या राजकीय डावपेचांचा परिणाम झाल्याने हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून उदयास आला आहे.

शिवसंपर्क अभियानाचा छोटेखानी कार्यक्रम प्रसादभाई जनसंपर्क कार्यालयात मोठया दिमाखात पार पडला असंख्य कार्यकर्ते शासनाच्या नियमांचे पालन करून या ठिकाणी सहभागी झाले होते. यावेळी महिला आघाडीची उपस्थिती लक्षणीय होती. आगामी निवडणूक सुध्दा अगदी सहजपणे केवळ निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या

माझा जन्म माथेरानचा असल्याने मी अगदी जवळून अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष पाहिले आहेत परंतु शिवसेना हा एक असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला वाटले की खरोखरच ह्या पक्षात काहीतरी नवीन आहे म्हणून मी या पक्षात आलो आहे.
सुभाष काळे –सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

आणि सुज्ञ मतदारांच्या सहकार्याने जिंकता येणार आहे.पुन्हा एकदा नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकविला जाईल असा ठाम विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ साडेचार वर्षात न भूतो न भविष्यती अशाप्रकारे कामे मार्गी लागत आहेत. दस्तुरी पासून ते ऑलिंपिया मैदान आणि संत रोहिदास नगर ते रग्बी विभाग असो की अन्य ठिकाणी प्रत्येक प्रभागात विकासाची गंगा ही केवळ शिवसेनेच्याच कार्यकाळात आणली गेली आहे.

सर्वसामान्य लोकांना उद्भवणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच शिवसेना अग्रेसर असते.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष माथेरान वर असून त्यांच्या कार्यकाळात भरीव निधी माथेरान साठी देत आहेत त्यामुळे अनेक विकास कामे पूर्णत्वास आली आहेत असे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर माजी नगरसेवक प्रकाश सुतार, जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे, योगेश जाधव, वसंत कदम, मयुरेश कदम, महिला आघाडी संघटक संगीता जांभळे, मीरा फाउंडेशन उपाध्यक्षा रेखा चौधरी, अवधूत येरफुले,यांसह अनेकांनी आपले अनमोल विचार यावेळी व्यक्त केले.

शिवसेनेने आजवरच्या कार्यकाळात अनेक विकास कामे खऱ्या अर्थाने पूर्ण केलेली आहेत त्यांच्या सोबत राहून नक्कीच या गावाच्या विकासासाठी काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आमच्या प्रभागात काही कामे करण्यासाठी प्रयत्न केल्यास एक ते दोन व्यक्तींशिवाय अन्य कुणीही येत नाही. म्हणून मी व माझ्या पत्नीने शिवसेनेचे सदस्यत्व स्वेच्छेने स्वीकारले आहे.
अक्षय सोनावणे माजी सदस्य भारतीय जनता पक्ष, माथेरान
शिवसेना ही खरोखरच उत्तम प्रकारे कामे करत आहे आणि ह्या गावाला विकासाकडे नेण्यासाठी या पक्षशिवाय अन्य काही पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे मी प्रभावित होऊन आजच्या शिव संपर्क अभियानांतर्गत आनंदाने प्रवेश केला आहे.
सचिन विलास काळे -माजी सदस्य काँग्रेस
माझा जन्म माथेरानचा असल्याने मी अगदी जवळून अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष पाहिले आहेत परंतु शिवसेना हा एक असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला वाटले की खरोखरच ह्या पक्षात काहीतरी नवीन आहे म्हणून मी या पक्षात आलो आहे.
 सुभाष काळे -

सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.