Press "Enter" to skip to content

केवाळे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा व महिलांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते हाती घेतला भगवा

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल ग्रामीण केवाळे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच नागेश पारवे व शे.का.प कार्यकर्ते राजेश पाटील यांच्या सह शेकडो पुरुष व महिलांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्या प्रसंगी शिवसेना उपमहानगर प्रमुख दिपक घरत, महिला आघडी च्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, महानगर संघटिका सौ.अँड. शुभांगी शेलार व मंदा जंगले आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड जिल्हा संपर्क संघटिका व मुंबई च्या महापौर किशोरीताई पेडणेकर व रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अनीता डांगरकर यांची शिवसेना महिला आघाडी पनवेल ग्रामीण तालुका संघटिका पदी नियुक्ती करण्यात आली व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.