रायगडच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करणार — पालकमंत्री आदिती तटकरे
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मतदासंघात विविध उपक्रम राबविण्यात येत असतांना अनेक विकासात्मक कामे डोळ्यासमोर ठेवून पेणच्या उपजिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका, आयुष गार्डन व पार्किंग यांचे लोकार्पण पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ.सुहास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजीव तांभाळे,पेण उपजिल्हा रुग्णालयातील रमेश गिरके, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, कायदेशीर सल्लागार मंगेश नेने, शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष विशाल बाफणा, माजी नगरसेवक हबिब खोत, पांडुरंग जाधव, जि.प. दिशा कमिटी सदस्य विकास पाटील, आदिंसह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना अदिती तटकरे म्हणाल्या की शासनाच्या अनेक योजना अंतर्गत जिल्ह्यात विविध खात्यांकरीता स्वताची जागा उपलब्ध करून दिली असून वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात अनेक डाॅक्टर्स, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पेण उपजिल्हा रुग्णालयात लोकसहभागातून आयुष गार्डन आणि पार्किंग यांचे लोकार्पण झाल्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या उपचा-यादरम्यांन नागरीकांसाठी थोडा विसावा मिळणार आहे त्यामुळे मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेणच्या विकासाकडे आम्हा सर्वांचे लक्ष आहे येत्या काळात अधिक विकास साध्यन्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.तर यावेळी पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारीका, आरोग कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी कोरोना काळात अतिशय महत्वाचे काम केले असल्याने डॉ.तांभाळे, डॉ. म्हात्रे, कर्मचारी गिरके, परिचारिका सौ.गवळी, सफाई कर्मचारी श्रीधर कांबळे, वाहनचालक खैरे आदिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.








Be First to Comment