सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे व मनसे महिला रोहा तालुका अध्यक्षा दीपाली घासे यांनी केले होते. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या अनेक विद्यार्थी कलाकारांनी राजसाहेब ठाकरे यांचे हुबेहूब चित्र रेखाटून पारितोषिक मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
या स्पर्धेचा निकाल अमित ठाकरे यांनी घोषित केला त्यामध्ये नागोठणे बंगले आळी मधील कु. समृद्धी बाळकृष्ण भालेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला तसेच द्वितीय क्रमांक योगेश हसुराम डाकी व तृतीय क्रमांक सौरभ शैलेश पिसाट यांनी मिळविला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माणगाव येथे मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या कार्यलायत देवेंद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विध्यार्थी कलाकारांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मनसे रोहा तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष साईनाथ धुळे, मनसे रोहा तालुका महिला अध्यक्ष दिपाली घासे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment