सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि. १० जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून नागोठणे विभागातील वरवठणे व पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीनेही ११ जुलै रोजी सकाळी खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करुन खा. सुनील तटकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करुन त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी राष्ट्वादीचे काँग्रेसचे विभागातील नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, मंगेश तेरडे, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, कार्यकारिणी सदस्य सचिन कळसकर, राष्ट्वादी युवकचे युवा नेते राकेश शिंदे, जिल्हा सचिव विनायक गोळे, विभाग युवक अध्यक्ष निवास पवार, विक्रांत घासे, प्रमोद जांबेकर, अमित जांबेकर, अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, मनोज टके, कुणाला तेरडे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरवठणे ग्रामपंचायतीच्या वतीने वरवठणे स्मशानभूमीच्या परिसरात, अंबा नदी किनारी आ. अनिकेतभाई तटकरेंच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. वरवठणेच्या सरपंच ऋतुजा गणपत म्हात्रे, उपसरपंच विजय पाटील, वरवठणे ग्रा.पं.सदस्य गणपत म्हात्रे, रेवती गोकुळ पाटील, पुष्पा म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, नथुराम पाटील, विश्वनाथ पाटील, तुकाराम म्हात्रे, गोकुळ पाटील, दिनेश म्हात्रे, सुवर्णा पाटील, ग्रामसेविका देवता भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर वरवठणे उपसरपंच विजय पाटील यांच्या आग्रहानुसार आ. अनिकेतभाई तटकरे यांनी वरवठणे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली असता ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांनी दिले.
त्यानंतर पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने राजिप शाळा, पिगोंडे च्या परिसरातही आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, उपसरपंच नाना बडे, सदस्य सखाराम घासे, धनाजी पारंगे, शैलेश शेलार, कांचन माळी, कुसूम बावकर, नेत्रा पारंगे, मनोज ताडकर, पुंडलिक ताडकर, विजय पारंगे, नंदकुमार कोळी, अंकुश ताडकर, रोशन पारंगे, संतोष ताडकर, प्रमोद चोरगे, महेंद्र तरे, तुकाराम बावकर आदींसह सर्व मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment