- माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांची मागणी
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल #
Covid 19 विषाणू चा प्रादुर्भाव समूह संक्रमणापर्यंत पसरला आहे. आगामी काळामध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता पनवेल उरण मधील जनतेला कोविड रुग्णालयांची निकड भासणार आहे. आधुनिक शहरांचे शिल्पकार म्हणवणाऱ्या सिडकोने अशावेळी मागे राहून कसे काय चालेल? त्यांनी ज्याप्रमाणे मुंबई व नवी मुंबईमध्ये जनतेसाठी कोविड रुग्णालय उभारले तसेच पनवेल उरण मधील जनतेकरिता देखील उभारावे अशी रोखठोक मागणी माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संदीप पाटील आमच्या प्रतिनिधीला म्हणाले की, नवी मुंबईमधील जनतेकरीता सिडकोने एगझीबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णालय निर्माण केले.मुलुंड येथे मुंबई मधील नागरिकांच्या साठी अद्ययावत असे बाराशे बेडचे कोविड रुग्णालय निर्माण केले. पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विचार केला असता, 78 % भूभाग हा सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींचा भूभाग येतो. उरण तालुक्यामध्ये देखील सिडको चे बऱ्यापैकी प्रस्थ आहे. या महामारी च्या काळामध्ये सिडकोने एक पाऊल पुढे येत किमान 500 बेड चे कोविड रुग्णालय उभारावे अशी मी मागणी केली आहे.सिडकोतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केल्यानंतर या मागणीचा ई-मेल मी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला आहे. लवकरच या विषयावरती मी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन हॉस्पिटल उभारणे संदर्भात सखोल चर्चा करणार आहे.माझ्या मागणीनुसार कोविड रुग्णालय उभारायला 10 ते 12 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे,जो सिडको सहज उचलू शकते,ज्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर सिडकोने इतके मोठ मोठाले प्रकल्प उभारले आहेत या भूमिपुत्रांच्या प्रति सिडकोचे एवढे दायित्व निश्चितच आहे, आणि याच मुद्द्याची मी संबंधित अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली आहे.असे संदीप पाटील म्हणाले.
Be First to Comment