नागोठण्यातील ही रुग्णवाहिका सर्व सामान्यांसाठी उपयोगी ठरेल : आमदार अनिकेत तटकरे
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे नागोठणे विभागासाठी देण्यात आलेल्या अद्ययावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नागोठण्यातील श्री शिवगणेश सभागृहाच्या प्रांगणात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, नागोठणे विभागावर खा. तटकरे साहेबांनी नेहमीच खूप प्रेम केले आहे. या परिसरांतील गावे, वाड्या-वस्त्यांवर अनेक विकासकामे करून दुर्गम वाड्या-वस्त्यांवर कधीही न झालेली रस्ते, वीजपुरवठा ही कामेही पूर्ण केली. असे असले तरी तटकरे साहेबांना मतदान करण्याचा योग या भागाला कधी आला नव्हता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळूनही आपला बालेकिल्ला असलेल्या या भागात अपेक्षित मतदान न झाल्याने साहेबांचा निसटता पराभव झाला होता.
त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही आपला पराभव झाला. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नागोठणे भागाने चांगली साथ दिली व जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचे मताधिक्य कापून त्याहून अधिक मताधिक्य घेत २०१४ च्या पराभवाचे उट्टे काढण्याचे काम या भागाने केले. समाजात जावून काम करण्याच्या साहेबांच्या ध्येय-धोरणानुसारच आजचा हा कार्यक्रम होत आहे. रुग्णवाहिका ही फिरण्यासाठी असलेली महागडी गाडी नसल्याने तिच्यात कुणालाही जायला आवडणार नाही. त्यामुळेच सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे साहेबांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागोठणे विभागासाठी देण्यात आलेल्या जिल्ह्यातील या १२ व्या रुग्णवाहिकेचा कमीत कमी उपयोग व्हावा आणि जरी झाला तरी ही रुग्णवाहिका ना नफा, ना तोटा या तत्वावर सर्वसामान्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल असा दृढ विश्वास आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे नागोठणे विभागात पक्षाला उभारी मिळाली असून पक्ष संघटना अधिक मजबूत होणार हे निश्चित असल्याचे यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, हरेश काळे, डॉ. राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, कृष्णा धामणे, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, कार्यकारिणी सदस्य सचिन कळसकर, युवक तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, राष्ट्वादी युवकचे युवा नेते राकेश शिंदे, जिल्हा सचिव विनायक गोळे, हिराजी शिंदे, पप्पू पोरवाल, विभाग युवक अध्यक्ष निवास पवार, नागोठणे ग्रा.पं. सदस्य अखलाक पानसरे, अतुल काळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुजाता जवके, आशा शिर्के, अमिता शिंदे, प्रतिभा तेरडे, महादेव डाकी, पांडुरंग म्हात्रे, मनोज ताडकर, विक्रांत घासे, भारत भोय, प्रमोद जांबेकर, दिपेंद्र आवाद, अमित जांबेकर, प्रकाश मोरे, नितीन पत्की, लियाकत कडवेकर, किसन बोरकर, जगदीश दिवेकर, अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, सिध्देश काळे, मंदार चितळे, वणीच्या सरपंच प्रगती आवाद, पळसच्या सरपंच परीक्षा घासे-चंदने, स्नेहल काळे, सोनी काळे, सुप्रिया जवके-तेलंगे, सुरेश शिनगारे, मंगेश जाधव, पांडुरंग चौलकर, रोहिदास हातनोलकर, मनोज टके, चेतन टके, दिनेश घाग, अक्षय नागोठणेकर, रोहित चौलकर, केतन भोय, उमेर सांगडे, कुणाला तेरडे, कुलदिप शहासने आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष सदानंद गायकर यावेळी म्हणाले की, रुग्णवाहिकेशिवाय या भागातील नागरिकांची होणारी कुचंबना मी अनुभवलेली असून नागोठणे विभागासाठी अत्यंत गरजेची असलेली ही रुग्णवाहिका सेवा कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांनाही उपयोगी ठरेल. तसेच आमच्या काळात तटकरे साहेब एकटेच काम करीत होते मात्र आता साहेबांची काम करण्याची हातोटी दोन्ही मुलेही सांभाळत असल्याने आत्ताच्या पिढीला या त्रिवेणी संगमाचा लाभ मिळून विकास कामांचा धडाका पहावयास मिळत असल्याचे गायकर म्हणाले.
तर शिवरामभाऊ शिंदे म्हणाले की, मी १९८४ पासून साहेबांच्या सोबत असून नागोठणे विभागाला ते आपल्या घरचाच एक भाग समजत आल्यानेच त्यांनी येथे अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत व भविष्यातही या विभागावरील प्रेमाखातर ते या विभागाला कधीही काही कमी पडू देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे ब्लँकेट व चादरीचे वाटप करण्यात आले. तसेच प्रा.आ. केद्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या २.२५ लाख रुपयांच्यस प्रशासकीय मंजुरीचे पत्रही यावेळी आ.केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांकडे देण्यात आले. तसेच यावेळी कोरोन काळात सेवा बजाविणारे नागोठणे ग्रा.पं. रुग्णवाहिका चालक राजा नागे, रिलायन्सचे रुग्णवाहिका चालक विजय पारंगे व मुजाहिद मुजावर यांचा सत्कारही यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच नागोठण्यात राष्ट्वादीतील इन कमिंग सुरूच असुन याच कार्यक्रमात येथील कोळीवाडा भागातील कडवट शिवसैनिक श्याम पाटील यांनी खा. सुनील तटकरे, ना. आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन खा. तटकरेंना वाढदिवसाची भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आपण या पक्षात आहात अशी वागणूक आपल्याला देण्यात येईल असे अभिवचन यावेळी प्रवेशकर्ते श्याम पाटील यांना आ. तटकरे यांनी दिले. तर राष्ट्रवादीचा नागोठणे हा बालेकिल्ला परत मिळविल्याशिवाय राहणार नाही असा दृढ विश्वास यावेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आ. तटकरे यांना दिला. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाहीर अशोक भंडारे यांनी खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरवपर गीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास हातनोलकर यांनी केले.
दरम्यान नागोठण्यातील या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यासममवेत आलेला खा. सुनील तटकरे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या २०-२५ गाड्यांचा ताफा पाहुन नागोठण्यात वेगळेच वातावरण निर्माण झाले. तसेच यामुळे नागोठणे शहर व विभागातील सर्व तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.








Be First to Comment