Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचायतीच्या शुद्ध पेय योजनेचेपालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुनिल वरदा या नावाने कन्यादान योजना प्रथम गोवे ग्रामपंचायतीत सुरु केले हे समाधान :- अदितीताई तटकरे

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

नेहमी तटकरे साहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्सहात साजरा केला जातो परंतु गेल्या दोन वर्षांपासुन कोरोना महामारीमुळे सर्व कार्यक्रमाला मर्यादा असल्यामुळे तो साजरा केला जात नसला तरी गोवे ग्रामपंचायतिच्या मार्फत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम गोवे ग्रामपंचायती मध्ये सुनिल वरदा या नावाने कन्यादान योजना सुरु करण्याचे समाधान आहे असे मत रायगडच्या पालक मंत्री आदितीताई तटकरे यांनी गोवे येथील खा.सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुद्ध पेय योजनेच्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

तसेच गोवे ग्रामपंचायतीमध्ये ५ रु. मध्ये २०लिटर सुद्ध पाणी देणे हे अतिशय महत्वाचे काम केले आहे त्या शिवाय महिला बचत गटांना घरघंटी,पापड मशीन,भजनी मंडळ साहित्य दिल्याने तेथील महिला सक्षम बनुन या महिलांचे लघु उद्योग एक वर्षांत आत बिग बाजारात विकली जाऊन एक वेगळी ओळख होईल असे प्रयत्न करावे.

आ. अनिकेतभाई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि शुद्ध पेयजल प्रकल्पाचा सोहळा महिलांच्या ताब्यात दिल्याने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने केल्याने महिलांची उजवी बाजू काहीही करु शकते हे माहिलांनी दाखवून दिले. ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्याने सर्व टीमचे कौतुक आहे. या ग्रामपंचायत मधील सर्व विकास कामे जी पाच वर्षात झाली नाही ती पाच महिन्यात झाली पुर्ण होतील.२५ कापूराची झाडे ही वाटप करण्यात आली तसेच या ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असुन कन्यादान योजना राबविण्यात येणारी राज्यातील पाहिली ग्रामपंचायत आहे.

गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि विकासाचे कार्यसम्राट यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगडच्या पालक मंत्री अदितीताई तटकरे, आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रयत्नाचे अनेक विकास कामे मार्गी लागली असुन राहिलेली अनेक विकास कामे पुर्ण होतील यामुळे आमच्या ग्रामपंचायतीला सुनिल तटकरे ग्राम विकास भवन असे नाव देण्यात येणार असल्याचे सुनील तटकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले

यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा प्रितम पाटील,रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, रोहा पंचायत समिती सदस्या सिद्धी राजिवले, तालुका संघटक रविना मालूसरे जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र चितळकर, तानाजी जाधव, प्रकाश थिटे,वसंत मरवडे, माजी सरपंच रामशेठ कापसे, देवकान्हे सरपंच वसंत भोईर,कोलाड सपोनि सुभाष जाधव,गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे,उपसरपंच नितीन जाधव व सर्व सदस्य,नरेंद्र जाधव, नरेंद्र पवार ,संदीप जाधव,राजेंद्र जाधव, नितीन जवके, तसेच कोलाड परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व गोवे, मुठवली, शिरवली येथील महिला वर्ग व ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी पोटफोडे यांनी केले तर प्रास्ताविक सुप्रिया जाधव तर कार्यक्रमाचे आभार आकांशा शिर्के हिने मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.