Press "Enter" to skip to content

माजी आ.धैर्यशील पाटील यांच्याकडून सानप परिवाराची सात्वंनंपर भेट

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र प्रतिष्ठित नागरिक व तालुका कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व माजी उपाध्य व
स्नेह ज्येष्ठ नागरीक कल्याणकारी मंडळ कोलाडचे संस्थापक-अध्यक्ष आणि रा. जि. ज्येष्ठ नागरीक संघाच्या समन्वय समितीचे माजी सदस्य दिनेश सानप तथा दगडूखोत यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्रुत्त समजताच पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.

तालुका कुणबी समाज व स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या दोन्ही संस्थांची जडणघडण व विकासासाठी त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील ममान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेटी देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.तर नुकतेच माजी आ.धैर्यशील पाटील यांनीही भेट त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या समवेत खरेदी विक्री संघाचे संचालक शिवराम महाबळे, मारुती खांडेकर,दिवाण सानप,पांडूरंग सानप,योगेश सानप हजर होते त्यांच्या पश्रात जावई मनोहर महाबळे मुलगी मनाली मनोहर महाबळे मुलगा संदेश सानप दोन सूना सायली .साक्षी नातु मनिष .कौस्तुभ अथर्व असा मोठा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.