सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते व पोलीस मित्र संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली तिवणे गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेने मध्ये प्रवेश केला.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व पोलीस मित्र संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली तिवणे गावातील एकनाथ हिरामण कोळंबे, सदाशिव नारायण कदम, गणेश अनंत कदम, समीर वसंत कदम, वासुदेव शांताराम कदम आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बीड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेना संघटना वाढीसाठी याचा खूप मोठा फायदा भविष्यात होणार आहे.
या प्रवेशप्रसंगी आमदार महेद्र थोरवे, जिल्हा प्रमुख तथा माझी आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, जिल्हा सल्लागार भरत भगत, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, उपतालुका अधिकारी प्रमोद सुर्वे, विभागप्रमुख नारायण पायघुडे, रमेश लोभी, शैलेश पाटील यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment