सिटी बेल | रोहे | प्रतिनिधी |
रोहे तालुक्यातील सानेगाव येथील रहिवासी व क्रुषीनिष्ठ शेतकरी धर्मा महादेव ठाकुर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८६ वर्षी दु:खद निधन झाले.ते रोहे तालुका कुणबी समाजाचे सरचिटणीस सुनील ठाकूर यांचे सख्खे चुलते होते.
प्रचंड मेहनती व कायमच आपल्या शेती क्षेत्राशी निगडित असणाऱ्या धर्मा ठाकूर यांनी शेती क्षेत्रात नेहमीच नवोपक्रम राबवून इतर शेतकरी वर्गालाही प्रोत्साहित केले होते.शांत व संयमी स्वभाव, सामाजिक कार्यात देखील मोलाचा सहभाग व सतत मेहनत हे त्यांचे गुणवैशिष्ट्ये होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी सानेगाव शंकर मंदिर (गंगा )येथे मंगळवार दि.१३ जुलै रोजी तर अंतिम धार्मिकविधी गुरु.दि. १५ जुलै रोजी सानेगाव येथे राहत्या घरी कोरोना नियमावलीचे पालन करून होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.








Be First to Comment