सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रा.जि.मध्यवर्ती सह.बँक अलिबाग कोलाड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि विद्यार्थी आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम पाले खु. येथे संपन्न करण्यात आला.
या अभियानप्रसंगी कोलाड आरडीसीसी शाखाधिकारी सौ.भावना सरफळे,संजय शेळके व मोठ्या संख्येने बचत गटातील महिला तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमात शाखाधिकारी सौ. भावना सरफळे यांनी बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महिला आणि विद्यार्थी आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानाचे महत्त्व पटवून दिले.तर शाळेतील विद्यार्थी, शेतकरी बांधव व बचत गटातील महिलांना यांच्या व्यवसाय व्रुद्धी व प्रगतीसाठी अल्पदर कर्जाविषयी तसेच बँकेतील सर्व प्रकारच्या योजनांबद्धल माहिती व मार्गदर्शन करून अल्पबचतीचे महत्त्व,गरज व फायदे याबाबत माहिती सांगितली.तर महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी आरडीसी बँक नेहमीच सहकार्य करीत असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी उपस्थितीतांना गुलाबपुष्प, मास्क तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोरोनाचे शासकीय नियवलीचे पालन करून सदरचे अभियान यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले.








Be First to Comment