एक हजार झाडे लावण्याचे कर्जत पालीकेचे उद्दिष्ट
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत कर्जत नगरपरिषदेच्या वतीने एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

नगरपरिषद हद्दीतील आमराई येथील खुले नाट्यगृहात वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, नगरपरिषद अधीक्षक अरविंद नातू, कर्मचारी सुनिल लाड, सुदाम म्हसे, रविंद्र लाड आदीसह सुरेखा प्रधान, सामिया चौगुले, प्रशांत उगले, प्रशांत परदेशी उपस्थित होते.








Be First to Comment