Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात रस्त्यावर जुनाट वृक्ष रिक्षावर कोसळला

रिक्षाचा चेंदामेंदा‌ : रिक्षा चालक गंभीर जखमी, तिघे किरकोळ जखमी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातून दांडफाट्याच्या दिशेने निघालेला कंटेनर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास एमएच-46,एआर-3369 हा मोहोपाडानजीक माणिक जनता पडिक वसाहतीसमोर आला असताना रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या जुनाट वृक्षाच्या फांदिला कंटेनरचा डावा भाग लागल्याने जुनाट वृक्षाच्या फांदीचा काही भाग खाली कोसळला.

याचवेळी बारापाडाहून मोहोपाडा शहराकडे निघालेली तीन आसनी सिएनजी रिक्षा माणिक प्रबलजवल आली असता सदर जुनाट वृक्षाच्या भल्यामोठ्या फांद्या खाली कोसळून एम एच-46,बिडी-6899 या रिक्षावर पडल्या या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचालक केतन कृष्णा पाटील (वय ३५) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून खांद्यालाही दुखापत झाली आहे. तर रिक्षातील दोन प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.जखमींना ताबडतोब उपचारार्थ हाॅस्पिटलात दाखल करण्यात आले .

भलामोठा वृक्ष रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी झाली.जवलपास पराडे काॅर्नंर ते चांभार्ली अशी वाहनांची रांग लागल्याचे दिसून आले.रस्त्यावरील भलामोठा वृक्ष बाजूला करण्यासाठी रसायनी पोलिसांनी अथक परिश्रम घेतले.रसायनी पोलिस, वाहतूक पोलीस व वासांबे मोहोपाडा कर्मचारी यांनी वृक्षाच्या फांद्या तोडून रस्त्यापासून बाजूला केल्या.जवलपास एक तासाच्या प्रयत्नानंतर मोहोपाडा रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

दरम्यान पराडे ते रिस या रस्त्याच्या दुतर्फा जुनाट वृक्ष असून या वृक्षाच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध झुकल्याने अपघात होत आहेत.या रस्त्यालगतच्या फांद्या तोडाव्यात यासाठी अनेकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज केले आहेत.परंतु सार्वजनिक बांधकाम खाते जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे दिसून येते.जुनाट वृक्ष पडल्याने कोणाचा जीव गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार राकेश खराडे यांनी केली आहे.या खात्याने पराडे रिस रस्त्यावरील जुनाट वृक्षाच्या फांद्या न हटविल्यास पत्रकार संघटनांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.