धोंडपाडा उघाडीची लिलाव नोटीस न मिळाल्याने लिलाव रद्द करण्याची मागणी
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीसा खारलँड विभागाकडून ग्रामपंचायतींना बजावण्यात आल्या होत्या मात्र उंबर्डे ग्रामपंचायत मध्ये धोंडपाडा खारलॅंड उघाडीच्या लिलावाची नोटिस पोहोचली नसून सदर लिलाव करून ती उघाडी बांधण्यासाठी अधिका-यांनी दिली कशी शेतकऱ्यांनी या लिलावामध्ये सहभाग न घेतल्याने सदर लिलाव रद्द करून पुन्हा करण्यात यावा या मागणीचे निवेदन धोंडपाडा गावातील शेतकऱ्यांनी पेण खारभुमी विकास अधिकारी अर्जून कोळी यांना दिले आहे.
28 जून रोजी खारलँड विभागाच्या कार्यालयात अनेक गावांच्या उघड्यांबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.त्यावेळी उंबर्डे ग्रामपंचायत हद्दीतील तीन शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.दुपारी 12 च्या दरम्यान धोंडपाडा गावातील उघाडीचा लिलाव होता, त्याप्रमाणे 3 शेतकरी उपस्थित राहिल्याने लिलावाची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याने यावर गावातील शेतकऱ्यांनी आम्हाला अथवा ग्रामपंचायतीला लिलावाची नोटिसच मिळाली नसतांना सदर प्रक्रिया पूर्ण केलीच कशी आम्ही लिलावापसून वंचित ठेवण्यात आले असून पुर्वजात पासून सदर उघाडी ही शेतकरी बांधत आहेत त्यामुळे आमचा हक्क आमच्या पासून हिरावून घेतल्याने नाराज शेतकऱ्यांनी उघाडीचे लिलाव पुन्हा एकदा रीतसर व्हावे अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पत्र देण्यात आले आहे.








Be First to Comment