पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रायगड लोकसभा मतदार संघांचे कर्तव्यदक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा ६६ वा वाढदिवस १० जुलै रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठण्यात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांसाठी बेडशीट व ब्लॅंकेट वाटपासह विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या लोकाभिमुख कार्यक्रमांस रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विनय गोळे यांनी दिली.
दरम्यान या संदर्भात विभागीय नेते भाई टके यांच्या नागोठणे येथील टके बिल्डिंग या निवासस्थानी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी भाई टके यांच्या समवेत युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, पाटणसई ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य अकलाख पानसरे, रोहा तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष पप्पूशेठ अधिकारी, युवा नेते दिपेंद्र अवाद, वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जांबेकर, युवक राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष निवास पवार, युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिनेश घाग, युवा नेते ऍड. श्रीकांत रावकर, मनोज टके, उमेर सांगडे , मंदार चितळे, चेतन टके, प्रफुल नागोठणेकर, दानिश कोंडेकर, मुशाहिद मुजावर, रोहित चौलकर ,सुमित काटले आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment