Press "Enter" to skip to content

चिल्हे येथे पावसात गुरांचा गोठा कोसळला

मालक दत्ता सुटे यांच्या प्रयत्नाने दहा गुरे बचावली

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर ७ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा सुरवात करताच एका शेतकऱ्याचा गुरांचा गोठा या पावसात गारद झाला मात्र सुदैवाने मालक दत्ता सुटे व त्यांच्या कुटूंबियांच्या अथक प्रयत्नातून तब्बल दहा गुरांचे प्राण वाचल्याची घटना घडली गुरुवारी पहाटे चिल्हे येथे घडली असून या बाबतची सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील गरीब शेतकरी व पशु पालन करणारे दत्ता दामोदर सुटे यांचा गुरांचा गोठा 8 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जोरदार झालेल्या पावसात अचानकपणे घरलागत असलेला गुरांचा गोठा गारद झाला दैव बलवत्तर मालक दत्ता सुटे आणि त्यांच्या कुटूंबियानें मोठ्या शर्तीने आपले जीव धोक्यात घालत या गोठ्यातील दहा गुरांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले असून सर्वत्र एकच खळबळ माजली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालक दत्ता सुटे हे पहाटे गाई व म्हशींचे दूध काढण्याकरिता नेहमीच्या वेळेनुसार गुरुवारी सकाळी उठले दूध काढण्या आधी गुरांना चारा घालण्यास गोठ्यात गेले पहाटे पाचच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता ते गुरांना चारा घालता घालता त्यांना गोठ्यातीवरील छप्परावरी कवळे हळण्यास सुरवात होत त्याचे वासे मोडत आहेत असे आवाज येताक्षणीच त्यांनी आपल्या पत्नी आणि कन्या यांना आवाज देत सर्व गुरांच्या गळ्यातील बांधलेली रस्सी (दावे) ताबडतोब तोडले यांनी गुरांपाठोपाठ ते ही सुखरूप गोठ्यातून बाहेर पडताच गोठा काहिक्षणातच गारद होण्याची घटना घडली.

दत्ता सुटे यांनी आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपल्या रोजीरोटीसाठी वडिलोपार्जित गाई म्हशी गुरांचे पालन करत दुग्धव्यवसाय करीत आहेत. परंतू मागील गेली आठवडाभर पावसाची विश्रांतीनंतर बुधवारी रात्री अचानकपणे जोरदार झालेल्या पावसात त्यांच्या गुरांचा गोठा जमिनदोस्त तसेच गुरांची वैरण कौले व शिवार यांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने सुटे त्यांच्यावर मोठे संकट निर्माण होऊन उपासमारीची वेळ आली आहे दत्ता सुटे यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीची लवकरात लवकर शासकीय पातळीवर दखल घेऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.