सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविणात यावेत यासाठी रेल्वे प्रशासनाशी गेल्या दोन वर्षा पासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना अखेर यश मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये सदर कामाची मंजुरी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे. यासाठी अंदाजे खर्च किती? काम कधी सुरू होणार आहे? तसेच बाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर काम कुठच्या तारखे पर्यंत पूर्ण होईल ते कळविले जाईल. असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
कर्जत स्थानकात आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. कधी आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात गाडी चुकायची तर कधी समान फलाटवरच रहायचे तर काही वेळा डबा पकडण्याचा नादात अपघातही झाले आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या दोन वर्षा पासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.
सुरुवातीला कर्जत रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्याची मागणी केली असता , रेल्वे प्रशासना कडून, कर्जत रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्याच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स ची गरजच नाही. असे कळविले होते. यावर पंकज ओसवाल यांनी कर्जत रेल्वे स्थनाकात एक्सप्रेस च्या डब्यांची स्थिती दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर्स ची का आवश्यकता आहे हे पटवून दिले व पुन्हा विनंती केली असता रेल्वे प्रशासनाने याकरिता कोणी जाहिरातदार उपलब्ध होतो काय? किंवा कुणी व्यावसायिक प्रसिद्धीसाठी उपलब्ध होतो काय? हे पाहिल्यावर कर्जत रेल्वे स्थानकावर तसे इंडिकेटर्स बसविण्यात येईल. असे ओसवाल यांना कळविले होते.
या बाबतीत रेल्वे प्रशासना कडून काहीच कार्यवाही होत नसल्याने ओसवाल यांनी काही दिवसांनी पुन्हा पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल याना फलाट क्रमांक एक ची लांबी वाढविल्या नंतर , इंडिकेटर्स बसविण्यात येईल असे कळविले.फलाट क्रमांक एक चे लांबीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे स्थानकात ज्या – ज्या सुविधा दिल्या पाहिजे होत्या त्या दिल्या आहेत असे सांगत कर्जत रेल्वे स्थानकावर इंडिकेटर्स ची आवश्यकता नाही असे रेल्वे प्रशासनाने म्हणायचे होते हे लक्षात आल्यावर ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला ‘कर्जत रेल्वे स्थानकावर इंडिकेटर्स बसविले नाहीत आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासना कडून आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये या कामाची मंजुरी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीय दिली आहे.
या कामाच्या बाबतीत खर्चाचे अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू आहे तसेच या कामा बाबतीत निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर पूर्ण करण्यात येईल मात्र ते आगाऊ कळविले जाईल असे रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांना कळविले आहे.








Be First to Comment