Press "Enter" to skip to content

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड व संवर्धन अभियान

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे वृक्षारोपण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे राबविण्यात आले.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिषठानच्यावतीने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले. सदर कार्यक्रम ततोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे आयोजित केला गेला. आमदार महेंद्र थोरवे, या वेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, उप सरपंच भारती पाटील, सदस्य प्रसाद भासे, मंगेश ठोंबरे, नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे आणि श्री सदस्य उपस्थित होते.

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नानासाहेबांचे विचार ऐकता व मांडता आले. नानासाहेबांच्या अथांग कर्तृत्वाला आणि नेहमीच समाजकार्याचे भान राखणाऱ्या अखंड श्री सदस्य परिवाराला नमन असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.