सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
कोरोनांची दुसरी लाट ओसरत असतांना तिसऱ्या लाटेच्या पाश्व भुमीवर ग्रूप ग्राम पंचायत वडगांव च्या माध्यमातून या परिसरातील असलेल्या नागरिकांची खबरदारी घ्यावी या उद्देशाने त्यांना कोरोना सारख्या आजाराने संक्रमित होवू नये यासाठी पुढाकार घेत आहे.कोरोना सारख्या आजारामुळे अनेकांना रोजगार गेला.जिथे काहीना दोन वेळा जेवनांची भ्रांत ते त्या महागड्या वस्तू खरेदी करण्यास सक्षम कसे असणार ? हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मास्क, सॅनिटायझर आणि स्टिमर चे आज सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आपण काही कामानिमित्ताने घराबाहेर पडावे लागले तर प्रथम तोंडाळा मास लावून पडावे. गर्दि च्या ठिकाणी जाणे टाळावे शिवाय सातत्याने सॅनिटायझर ने हात धुवा त्याच बरोबर बाहेरून घरी आल्यास प्रथम स्टिमर ( म्हणजे गरम वाफ घेण्यासाठी हे स्टिमर देण्यात आले.आपली ग्रामपंचायत कोरोना मुक्त होण्यासाठी सातत्याने प्रयंत्नशिल असून नागरिकांना मिळाल्या सुरक्षा किटचा योग्य वापर करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.त्याच बरोबर हे सुरक्षा किट वाटप करण्याचे काम सुरुच राहणार असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच गौरी गडगे,सदस्य संदेश मालकर,नंदकुमार पाटील, हरेश पाटील, सदस्या सरिता गडगे,चंद्रकला कातकरी, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, जेष्ठ नागरिक मदन ठोंबरे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय चौधरी, विकास पारिंगे,मयूरी बडेकर,काशिनाथ पारधी आणि ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थी आदी सुरक्षा किट वाटप करतांना उपस्थित होते.








Be First to Comment