Press "Enter" to skip to content

नागोठणे पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर नाकाबंदी

दररोज हजारो रूपयांचा दंड वसुली

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही बाबतीत निर्बंध शिथिल केले असले तरी प्रवास करतांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या वाहनांवर व प्रवाशांवर पोलिसांकडून सर्वत्र कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील येथील हायवे नाक्यावर नागोठणे पोलिस ठाण्याच्या पथकाकडून नाकाबंदी करुन हजारो रुपयांची दंड वसुली दररोज करण्यात येत आहे.

त्यानुसारच करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत विना मास्क असणाऱ्या १४ प्रवाशांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ७ हजार रुपये तर नियमापेक्षा जास्त प्रवाशी असणाऱ्या २० वाहन चालकांकडून ४ हजार रपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नागोठणे पोलिस ठाण्याअंतर्गत मुंबई गोवा महामार्गावर करण्यात येत असलेल्या या दंडात्मक कारवाईत सपोनि विजयकुमार देशमुख, सहाय्यक पो.उ.नि. गणेश भऊड, स.पो.उ.नि. मोहन म्हात्रे, पो.ह. जितेंद्र चव्हाण, पो.ह. गणेश भोईर, महिला पो.ह. दया पाटील, महिला पो.ह. राजश्री तिवरे, पो.ना. गंगाराम डुमने, पो.ना. सचिन भोईर, महिला पो.ना. ज्योती भोईर आदींचे पथक सहभागी झाले होते. नागोठणे पोलिसांकडून दररोज सकाळपासून ते दुपारपर्यत नंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेत असे दोन वेळ महामार्गावर नाकाबंदी करण्यात येत असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.