सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
येथील शांतीनगर भागातील रहिवासी सौ. रुपाली रविंद्र टके (वय ५०) यांचे अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. नाभिक समाजाचे क्रियाशील नेतृत्व, नाभिक समाज संघांचे रोहा तालुक्याचे माजी अध्यक्ष रवींद्र टके यांच्या त्या पत्नी होत्या.
श्रीमती रुपाली टके यांना दोन दिवसांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. परंतु सोमवारी त्यांची निधनाची शोक वार्ता नागोठण्यात पसरली. त्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त करून श्रीमती रुपाली टके यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान श्रीमती रुपाली रविंद्र टके यांच्या पार्थिवावर अलिबाग येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीमती रुपाली टके यांची राहणी साधी होती. त्या उत्तम गृहिणी होत्या. समाजातील विविध कार्यक्रमात इतर महिला वर्गासह त्या हिरिरीने भाग घ्यायच्या. त्यांचा स्वभाव मनमिळवू व प्रेमळ होता. श्रीमती रुपाली टके यांच्या पश्चात पती रवींद्र टके, मुलगा रुपेश टके, विवाहित मुलगी ऋणाली साळुंखे व रेश्मा टके या दोन मुली यांच्यासह सुन, जावई व नातू असा परिवार आहे.








Be First to Comment