Press "Enter" to skip to content

वडगाव ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकटाची टांगती तलवार अजूनही मानवजातीच्या मानगुटीवर टांगतीच आहे. कोरोना संसर्गांची पहिली लाट,त्यानंतर दुसरी ही लाट आली ती आता ओसरत असतानाच तीसरीही लाट येणार असे भाकीत वर्तवले जात आहे. याच कोविड – १९ च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि स्टिमरचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देऊन सरपंच गौरी महादेव गडगे यांनी गोरगरिब नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा तसेच कोरोनामुक्त परीसर व्हावा यासाठी सरपंच गौरी महादेव गडगे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाटपप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदेश मालकर,नंदकुमार पाटील, हरेश पाटील, सदस्या सरिता गडगे,चंद्रकला कातकरी, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, जेष्ठ नागरिक मदन ठोंबरे,ग्रामपंचायतचे कर्मचारी विजय चौधरी,विकास पारिंगे,मयूरी बडेकर,काशिनाथ पारधी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह लाभार्थी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.