पत्रकारांना ४ लाख रुपये मूल्याची अपघाती विमा पॉलिसी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पत्रकार बांधवांची मेहनत पाहता या धकाधकीच्या जीवनात अपघाती विमा असावा यासाठी छोटेखानी समारंभात समिती उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्या उपस्थितीत समितीच्या सदस्यांना चार लाख रुपये मूल्याची अपघाती विमा पॉलिसी देण्यात आली.
सध्याचे जीवन खूपच धकाधकीचे झाले आहे तूर्तास जरी कोरोनाची लाट असली तरीही अपघाताचे प्रमाण ही लक्षणीय आहे. त्यामुळे अशा एखाद्या अपघातानंतर समितीच्या सदस्याच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत मिळावी या हेतूने ही पॉलिसी देण्यात आली आहे.
पत्रकार बांधवांना आपल्या जबाबदारीचे काम करत असताना दुर्दैवाने वाईट घटना घडल्यास त्यांना हातभार लागावा यासाठी आपघाती विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे समजते.








Be First to Comment