Press "Enter" to skip to content

आरोग्ययंत्रणेला मास्क व सॅनिटायझर तर गरजूंना शिवभोजन थाळीचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एकीकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनांचे संकट या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहे.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तमच असते असे नाही.तर काही ना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत यामुळे एक दिवस का होइना त्यांच्या जेवणांचा प्रश्न मार्गी लावावा या विचारांतून मोहोपाडा व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा यांनी वाढदिवसांचे औचित्य साधून मोहोपाडा येथे शिवभोजन थाळी वाटप केली. तर मोहोपाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक व सेविकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

वाढदिवस म्हणजे आपल्या जिवनातील मोठा आनंदाचा दिवस,प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.मात्र हा दिवस आपण कुणाच्या तरी सहवासात साजरा करावा या उद्देशाने व्यापारी असोसिएशनचे सचिव अमित शहा यांनी शिवभोजन थाळी वाटप तसेच कोरोनाशी लढत असलेल्या आरोग्ययंत्रणेला मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचा संकल्प केला.यावेळी शिव भोजन थाळी वाटप करताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते.

कोरोना सारख्या ह्या महामारी प्रत्येकांना पोट भर अन्न मिळते असे नाही.मात्र आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकांची भुक मात्र शांत झाली याचेच अमित शहा यांना समाधान मिळाले.यावेली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी व इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.