Press "Enter" to skip to content

रोहे तालुका कुणबी समाजाच्या वतीने सानप परिवाराप्रती ऋणनिर्देशन व्यक्त

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र प्रतिष्ठित नागरिक व तालुका कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष
दिनेश सानप तथा दगडूखोत यांचेबुध.दि.३० जून रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

समाजनेते दिनेश सानप तथा दगडूखोत यांनी आपल्या हयातीत समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कुणबी समाजोन्नती संघ संलग्न ग्रामीण शाखा रोहे याच्या वतीने त्यांच्या कार्याबद्दल क्रुतज्ञतता पूर्वक ऋणनिर्देशनाची भावना व्यक्त केली आहे.

तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे व सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक व्यक्त करून समाजाचा आधारवड गेला असल्याची भावना व्यक्त करून सरचिटणीस सुनील ठाकूर यांनी समाजाच्या वतीने त्यांच्याप्रती क्रुतज्ञपणाची भावना व्यक्त करून ऋणनिर्देशन पत्र लिहून समाजाच्या त्यांच्याबाबत असणाऱ्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.
तसेच स्नेह ज्येष्ठ नागरीक कल्याणकारी मंडळ कोलाडचे संस्थापक-अध्यक्ष आणि रा. जि. ज्येष्ठ नागरीक संघाच्या समन्वय समितीचे माजी सदस्य आदी पदावर कार्य करून त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठीही मोलाचे कार्य केले असल्याने जेष्ठ नागरिक मंडळाने त्यांच्या दु:खद निधनाप्रती शोक व्यक्त करीत कोलाड येथे शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.