Press "Enter" to skip to content

“राजर्षी शाहू महाराज आँनलाईन काव्यसंमेलन” जल्लोषात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी विभाग, मंडणगड तालुका शाखा आणि विद्यार्थी मदत संघटना , मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय आँनलाईन “राजर्षी शाहू महाराज काव्यसंमेलन” गुगल मीट अँपवर मोठ्या जल्लोषात संपन्न करण्यात आले.

सदर काव्यसंमेलनाच्या सुरुवातीला संदीप तोडकर, अ.भा.म.सा.प.मंडणगड तालुका अध्यक्ष यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नंतर संगीता पंदिरकर, मंडणगड उपाध्यक्षा यांनी सुरेल आवाजात गणेशस्तवन सादर करुन काव्यसंमेलनाची सुरुवात केली. तद्नंतर सचिन शिर्के यांनी जिजाऊ स्तवन सादर केले.

संमेलनाध्यक्ष पद डॉ.अ.ना.रसनकुटे, अ.भा.म.सा.प. कोकण प्रदेशाध्यक्ष यांनी भुषवले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी शाहू महाराजांविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अलका नाईक, कोकण प्रदेश उपाध्यक्षा उपस्थित होत्या. त्यांनीही उपस्थित सारस्वतांचे मार्गदर्शन केले. विद्यार्थी मदत संघटनेचे अध्यक्ष राजेश इंगळे आणि पदाधिकारी यांची भाषणे झाली.

तदनंतर राज्यभरातून संमेलनासाठी उपस्थित असलेल्या ३५ सारस्वतांनी आपल्या राजर्षी शाहू महाराज काव्यरचना सादर केल्या. शेवटी मंडणगड तालुका अध्यक्ष संदीप तोडकर यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. अ.ना.रसनकुटे, प्रमुख अतिथी डॉ. अलका नाईक आणि उपस्थित सर्व मान्यवर तसेच सहभागी सारस्वतांचे आभार मानले. “मंडणगड शाखेचे दुसरे आँनलाईन काव्यसंमेलन सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाले तर यापुढे असेच प्रेम मंडणगड तालुका शाखेवर सदैव ठेवावे” ही भावना व्यक्त करुन सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.