Press "Enter" to skip to content

वाकत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे भरत शेळके यांची निवड

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाकस येथील माजी उपसरपंच रंजना विठ्ठल भागीत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे भरत बबन शेळके यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायतच्या सरपंच सुदर्शना तांबोळी यांच्या अध्यतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेस रंजना भागीत, अशोक पेमारे, सुबोध जगे, रेशमा पवार, गायत्री दुर्गे, सदस्य चंद्रकांत पवार सदस्य बैठकीला उपस्थित होते. भरत शेळके याचा एकमेव अर्ज असल्याने यत्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा रंजना धुळेयांनी त्यांचे अभिनंदन केले, माजी उपसरपंच भाऊ दुर्गे, विठ्ठल भागीत,मंगेश पवार, चंद्रकांत मोरे,भाऊ भागीत, गणेश दुर्गे, विठ्ठल भुंडेरे,अनंत दळवी, भास्कर कांबरी, गणेश पवार, दीपक मोरे, तसेच ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.