सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील कांदळे-बेलवाडी गावचे रहिवासी व विठ्ठलाचे निस्सिम भक्त असणारे व आयुष्याची शंभरी गाठणारे ह.भ.प.शंकर महादेव गायकवाड यांचे राहत्या घरी व्रुद्धपकाळाने दु:खद निधन झाले.
संपूर्ण आयुष्यात वारकरी सांप्रदायाची सेवा करून नियमितपणे आळंदी व पंढरपूरची वारी करणारे ह.भ.प.शंकर गायकवाड हे मनाने फार प्रेमळ व सर्वांशी मिळून मिसळून वागायचे.त्यांच्या तारुण्याच्या काळात कोणतेही वाहन नव्हते तरीही ते वेळप्रसंगी कोलाड ते कांदळे हे सुमारे १५ किमीचे अंतर पायी पायी पार करायचे.गाव व समाजाचे तसेच सांप्रदायाचे विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.अतिशय प्रामाणिक जीवन जगून शेती व्यवसायाला विशेष प्राधान्य देऊन जीवनातात एका मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी निभावली.त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीयांकडून दु:ख व्यक्त करण्यात आले. तर कोरोना नियमावलीचे पालन करुन त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली,सुना,जावई,एकोणीस नातवंडे, एकवीस पतवंडे असा फार मोठा गोतावळा असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार दि.६ जुलै रोजी उद्धर-रामेश्वर पाली येथे तर अंतिम धार्मिकविधी शुक्र. दि.९ जुलै रोजी कांदळे-बेलवाडी येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment