तैलिक महासभेच्या रोहा शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर
सिटी बेल| नागोठणे | महेश पवार |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द करण्यात आलेले ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी आवश्यक एम्पीरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षण आरक्षण स्थगितीचा आदेश रद्द करावा, राज्य व केंद्र सरकारच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा, तसेच मंडळ आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत तैलिक महासभेच्या रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या वतीने सर्व तहसीलदारांना निवेदने देण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून तैलिक महासभेच्या रोहा तालुका शाखेच्या वतीने रोहा तालुक्याच्या तहसीलदार कविता जाधव यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरण काळे, रोहा तालुका अध्यक्ष संतोष कोते, विनायक पवार, मोहन पावस्कर, हेमंत तारलेकर, राजेंद्र वाचकवडे, प्रथमेश काळे, सिद्धेश काळे, उमेश शेडगे आदी पदाधिकारी व सदस्यांसह रोहा, नागोठणे व कोलाड येथील इतर तेली समाज बांधव यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment