कर्तव्य आणि आधार याची सांगड म्हणजे पोलीस दादा कथा संग्रह – शिवव्याख्याते प्रशांत देशमुख
सिटी बेल | खालापूर | प्रतिनिधी |
गुन्हेगारी सत्यघटनेवर आधारित पोलीसदादा हे पुस्तक म्हणजेच पोलीस याचा अर्थ कर्तव्य आणि दादा म्हणजे आधार या दोन शब्दांची सांगड असल्याचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि लेखक प्रशांत देशमुख यांनी सांगितले. ते खालापूर येथील पोलीस दादा या ई साहित्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते .
रसायनी पोलीस ठाणे येथे कार्यरत सहाय्यक फौजदार महेश मधुकर कळमकर यांचा कर्तव्य बजावत असताना कोरोना आजारात मृत्यू झाला होता. प्रथम स्मृतिदिन निमित्ताने पोलीसदादा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला खालपूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार खालपूर प्रथम नगराध्यक्षा शिवानी जंगम ,खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी ,डॉक्टर घनश्याम आठवले, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता चिंबूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवकाळातील संदर्भाचा उल्लेख करताना शिवव्याख्याते प्रशांत देशमुख याने बहिर्जी नाईक ह्यांत गुप्तहेर खातं आणि पोलीस विभाग करीत असलेल्या कामात खूप साम्य असल्याचे सांगत पोलिसांना विविध भूमिका पार पाडाव्या लागत असल्याचे सांगितले. तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी कैलासवासी महेश कळमकर यांच्या स्मृती जागवताना कोरोना काळात रात्री-अपरात्री महेश कळमकर मदतीला धावून जात असल्याचे सांगितले .

खालापुर नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी महेश कळमकर पोलीस खात्यात असले तरी त्यांच्याविषयी धाक न वाटता सर्वसामान्यांना आधार वाटत होता अशी भावना व्यक्त केली. डॉक्टर आठवले यांनी कोरोना काळात देखील जिवाची पर्वा न करता महेश कळमकर यांनी बजावलेले कर्तव्याची आठवण सांगताना त्यांना गहिवरून आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खालापूर पोलीस ठाण्यात कार्य असलेले सहाय्यक फौजदार तुळशीराम तात्याबा भिंगारे यांनी आरोपी पकडता दाखवलेल्या शौर्याबद्दल दिपस्तंभ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्याला पोलीस कर्मचारी सुभाष म्हात्रे तुषार आठरे विठ्ठल घावस, पत्रकार अर्जुन कदम प्रसाद अटक, संदीप ओव्हाळ, सचिन कळमकर, स्वामी विवेकानंद शाळेचे
श्रीकांत कोकणी ,गायकवाड आणि मुंडे शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश विचारे आणि आभार पोलीस दादा पुस्तकाचे लेखक मनोज कळमकर यांनी मानले.








Be First to Comment