नवनिर्वाचित अध्यक्ष पदी आकाक्ष रुमडे तर सचिव पदी सत्येन देशपांडे यांची निवड
सिटी बेल | कोलाड | कल्पेश पवार |
रोह्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलने प्रथम वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले असून नवनिर्वाचित अध्यक्ष पदी आकाक्ष रुमडे तर सचिव पदी सत्येन देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

२ नोव्हेंबर २०२० रोजी रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलने आरटीआर वैष्णवी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली ( माजी अध्यक्षा) वर्षाची सुरुवात केली होती .कोविड असुन सुद्धा मागील मा.अध्यक्षा वैष्णवी पोटे व त्यांचे सचिव नील डिसोझा आणि त्यांच्या पूर्ण टीम ने उत्तमरीतीने समाजकार्य व इत्यादी कार्यातुन आपल्या कल्ब ची प्रचीती केली जसे की वोकल फोर लोकल, वुमन एम्पॉवरमेंट आणि आवचितगड संवर्धन अश्या प्रकारचे कित्येक मोठे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडले. ह्या सर्वात रोटरी कल्ब आॅफ रोहा सेंट्रल ची मौल्यवान साथ लाभली.
१ जुलै २०२१ रोजी रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलने त्यांचे नवीन व दुसर्या पर्वाची सुरुवात उत्कृष्ट रित्या केली. रोटरॅक्टर वैष्णवी पोटे ह्यानी रोटरॅक्ट चे नवीन वर्ष २०२१-२२ ह्यासाठी क्ल्बचे नवीन अध्यक्ष रोटरॅक्टर आकाक्ष रुमडे व नवीन सचिव रोटरॅक्टर सत्येन देशपांडे ह्यांना सर्व सूत्रे सुपूर्त केली आहेत. तसेच रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल हे ह्या वर्षी जास्त करून निसर्ग सौदर्य जोपासण्यास जास्त भर पडणार आहेत. त्याकरिता या सर्वांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.








Be First to Comment