सेक्रेटरी पदी अजित तेलंगे यांची नियुक्ती
नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात : डॉक्टर डे च्या निमित्ताने रोहयातिल 60 हुन अधिक डॉक्टरांचे केले सन्मान व गौरव
सिटी बेल | कोलाड | कल्पेश पवार |
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या अध्यक्ष पदी डॉ. कैलाश जैन तर सेक्रेटरी पदी अजित तेलंगे यांची नियुक्ती होताच नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली असून डॉक्टर डे च्या निमित्ताने रोहयातिल 60 हुन अधिक डॉक्टरांचे रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल
तर्फे सन्मान व गौरव करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितित स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोहेकरां च्या निरामय स्वास्थ्यासाठी सतत झटत असणाऱ्या रोह्यातिल डॉक्टराना रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे डॉक्टर्स डे निमित्त गुरुवार दिनांक 1 जुलै रोजी रोहयातिल डॉक्टरांचे सन्मान करण्यात आले.
गौरव पत्र आणि आत्ता ची ऑक्सीजन ची गरज पाहता जे वृक्ष सर्वात जास्त ऑक्सीजन देते आसे आरेका पाम चे वृक्ष देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे अध्यक्ष डॉ. कैलाश जैन यांनी अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्या नंतर पहिल्याच दिवशी उपक्रम घेवून आपल्या कारकीर्दीस दमदार सुरवात केलि. या उपक्रमाला रोटरी क्लब रोहा सेंट्रल चे प्रेसिडेंट डॉ. कैलाश जैन, सेक्रेटरी रो.अजित तेलंगे,डिस्ट्रिक्ट एजीए रो. मयुर दिवेकर, डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो.गणेश सरदार, डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन कल्चर कमिटी रो. सुचित पाटिल, रोट्रेक्ट प्रेसिडेंट आकाश रुमाडे, क्लब सदस्य रो.गितराज म्हस्के, रो.डॉ. प्रथमेश बुधे,रो.परेश जैन, रो. राम नाकती, रो. सचिन कदम, रो.लियाकत हाफिज, रो. राहुल जैन व रोट्रेक्ट क्लब चे सदस्य उपस्तित होते.
रोहयातील सर्व डॉक्टरांचा आनंद आज द्विगुणित झाला आणि रोटरी क्लब रोहा सेंट्रल च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून यापुढे सुद्धा क्लब कडून आजुन मोठी सामाजिक कामे व्हावे या दृष्टिकोणा तुन पुढील वाटचालीस भरभरूंन शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment