Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये मोटार वाहनांच्या लांबच लांब रांगा

पार्किंगची अपुरी व्यवस्था : वन संरक्षक समिती, वनखात्याचे दुर्लक्ष

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दि.२६ जून पासून माथेरानची टाळेबंदी उठविण्यात आली आहे त्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पावसाळ्यात माथेरानची नेरळ ते माथेरान दरम्यान मिनिट्रेन सेवा चार महिने बंद असते त्यामुळेच एकमेव असणाऱ्या या घाटमार्गावरून मोटार वाहनांची रेलचेल सुरू असते. लॉक डाऊन काळात पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली होती त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

केव्हा एकदा हे लॉक डाऊन उठते याच प्रतीक्षेत असणाऱ्या स्थानिकांना नुकताच आठ दिवसांपूर्वी पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यामुळे सर्वानाच चांगल्या प्रकारे व्यवसाय निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या आणि वन संरक्षक समितीच्या माध्यमातून वाहन कर आकारणी चांगल्या पद्धतीने होत असताना ही समिती आणि वनखात्याचे अधिकारी पार्किंग बाबतीत नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत.

येणाऱ्या वाहनांची देखभाल अथवा गाड्यांची चोरी वा काही नुकसान झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सुध्दा घेतली जात नाही. एमएमआरडीए मार्फत या ठिकाणी पार्किंग साठी मोठया प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे परंतु योग्य नियोजन नसल्यामुळे इमारतीच्या सर्व प्रकारच्या साहित्यानी त्याचप्रमाणे गावाची जी काही विकास कामे होत आहेत त्यासाठी लागणारे जांभा दगड वगैरे यांनी हा बहुतांश भाग व्यापलेला दिसत आहे त्यामुळे एवढा निधी खर्च करून सुध्दा वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही.

लॉक डाऊन नंतर पहिल्याच शनिवारी या सुट्टीच्या दिवशी दस्तुरी नाक्यावर वाहनांची संख्या वाढली होती त्यामुळे कित्येक गाड्या या तिसऱ्या वळणापर्यंत घाटात लावण्यात आल्या आहेत आणि तेथून एक ते दीड किलोमीटरची सामान घेऊन पर्यटकांनाआपल्या लहान लहान मुलांना घेऊन पायपीट करावी लागत आहे.

तर बहुतेक गाड्या ह्या जागेअभावी माघारी गेल्या आहेत याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. आणि वन समितीच्या उत्पन्नात सुध्दा गाडया माघारी जात असल्याने तोटा सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी पॅनोरमा पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्या कडे गाड्या पार्क केल्या जातात परंतु हा भाग सुध्दा बंद करण्यात आला आहे तर माउंट बेरी या पॉईंट जवळ सुध्दा अनेक गाड्यांची पार्किंग उपलब्ध होऊ शकते. परंतु वनखात्याच्या आणि वन समितीच्या अयोग्य नियोजनाच्या अभावामुळे नाहक त्रास येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद सुध्दा वाहन कर आकारणी करत आहेत त्यामुळे नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने त्याचप्रमाणे वनखात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पर्यटकांना होत असलेल्या अडचणींवर लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

सध्या माथेरान शहराच्या हद्दीत माथेरान नगरपरिषद व MMRDA ची जी विकासकामे चालू आहेत त्याकरिता लागणार material हे पाच ट्रान्सपोर्ट व MMRDA च्या ठेकेदाराचे अस सर्व अस्ताव्यस्त आहै वारंवार सुचना करून देखील ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही त्यामुळे किमान 100 गाडी चे पार्किंग अडविले आहे तसेच माथेरानकर व हाँटेलिअर्स यांच्या स्वतः च्या मालकीच्या गाडयामध्ये पूर्वीच्या प्रमाणात वाढ झाली असून त्या जेमतेम 200 आहेत तसेच MP 93 प्ताँट व आजुबाजूच्या परिसराचा मालवाहतूक घोडेवाल्याकडून सरास वापर या सर्व गोष्टी पार्किंग फक्त 300 ते 350 गाड्या आल्या कि फूल होणेस कारणीभूत आहे यामध्ये माथेरान नगरपालिका व वन विभाग कारवाई करणेस हतबल आहेत.

योगेश जाधव – अध्यक्ष वन संरक्षक समिती
माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.