Press "Enter" to skip to content

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत वृक्षलागवड आणि संवर्धनाची जबाबदारी

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील तीन घरकुल लाभार्थांना सर्वोत्कृष्ट घरकुल प्रशस्तीपत्र देऊन गौरव


सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील तिघा लाभार्थ्यांना सर्वोत्कृष्ट घरकुल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमाच्या माध्यमातून मिना चंदर नाईक यांना प्रथम क्रमांक तर शंकर दगडू निकाळजे यांना द्वितीय क्रमांक तर सुदाम शंकर कातकरी यांना तृतीय क्रमांकाचा मान देऊन सर्वोत्कृष्ट घरकुल म्हणून लोधिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक शैलेंद्र नारायण तांडेल, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब कुंडलिक गोलार यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सांगळे,अशोक ठाकूर,पत्रकार अमोल सांगळे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान प्रदूषणामुळे जागतिक स्तरावर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास तसेच सध्या कोरोनाच्या काळात आपल्या देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेलेले हजारो जीव हे अतिशय भीषण असे वास्तव अनेकांनी अनुभवले आहे.एक जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधत लोधिवली ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करुन,ऑक्सिजनची पातळी वाढवू या, हा संदेश ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना दिला.

यावेळी लोधिवली गुरचरण परिसरात १०० हून अधिक वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचा संदेश वृक्ष लागवड करून दिला. वृक्षांमुळे ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत होते.

मात्र निसर्गाचे बदललेले चित्र थांबविण्यांची ताकद ही वृक्षामध्येच असल्यामुळे लोधिवली ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

कोरोनांच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला अमुल्य जीव गमवावा लागलेला आहे.आॕक्सिजन हा प्राण वायु असल्यामुळे आणि त्याची निर्मिती ही वटवृक्षांमुळे होत असल्यामुळे याचे मोल ओळखून आज लोधिवली ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन.वृक्ष लागवड करा,त्यांचे संवर्धन करा,पर्यावरणांचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणे अतिषय महत्वाचे आसते. यामुळे ग्रूप ग्राम पंचायत लोधिवली येथील गुरचरण जागेत कडूनिंब, वड, पिंपळ, गुलमोहर, करंज अशा अनेक जातीच्या १०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी वृक्ष लागवडीस लोधिवली ग्रूप ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब कुंडलीक गोलार,सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकूर,एकनाथ सांगळे,पत्रकार अमोल सांगळे,लोधिवली ग्रामस्थांन सह ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग वृक्ष लागवड करण्यासाठी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.