माजी आमदार सुरेश लाड यांचे मार्गदर्शन !
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मुंबई- पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून कर्जत तालुक्याची ओळख आहे, मात्र आदिवासी, दुर्गम भाग म्हणून अनेक वाड्यांना उन्हाळ्यात पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागते.माजी आमदार सुरेश लाड यांचे मार्गदर्शनावाखाली काम करत असलेले रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे कर्जत तालुक्याची पाणी टंचाई अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पाणी पुरवठा योजनांसाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.
कर्जत तालुका आदिवासी तालुका असून तालुक्यातील वारंवार भेडसावणारी भीषण पाणीटंचाई म्हणून कर्जत तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख निर्माण झाली होती. शेतीच तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याची देखील दुर्मिक्ष या तालुक्याला सतत भासत आहे. अनेक पाणी परिषद झाल्या, आश्वासनांच्या फैरी झाडल्या गेल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, कर्जत करांच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती कायमच राहिली मात्र, याला अपवाद ठरले ते रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या राजिप उपाध्यक्ष कारकिर्दीला दोन वर्षं पूर्ण होत नाही तोच कर्जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी माजी आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यात सुधाकर घारे यशस्वी ठरले आहेत.
कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायत हद्दीतील नळ पाणी योजनांना सुमारे कोट्यावधी रुपयांच्या निधी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. येत्या काळात कर्जत तालुका टँकरमुक्त तालुका करण्याचे ध्येय सुधाकर घारे यांचे आहे.
सन 2020-21 मधील मंजूर योजनांच्या तपशील खालील प्रमाणे –
# मौजे भूतीवली येथील नळ पाणी पुरवठा योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा. पं. आसल ता. कर्जत – (1 कोटी 17 लक्ष 64 हजार 182 रुपये)
# मौजे कळंब येथील नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रामपंचायत कळंब, ता. कर्जत – (1 कोटी 90 लक्ष 84 हजार 289 रुपये)
# मौजे अंबेरपाडा नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा. पं. आंबेरपाडा, ता. कर्जत – (70 लक्ष 67 हजार 600 रुपये)
# मौजे ओलमण नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा पं ओळमन, ता. कर्जत – ( 68 लक्ष 9 हजार 513 रुपये)
# मौजे नेवाळी तर्फे वासरे नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा पं बीड बु, ता. कर्जत – (37 लक्ष 74 हजार रुपये)
# मौजे मोहिली नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा पं बीड बु, ता कर्जत – (29 लक्ष 46 हजार )
# मौजे कोंदिवडे नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा पं. कोंदिवडे, ता कर्जत – (25 लक्ष)
# मौजे पळसदरी नळ पाणी योजना करणे, (जल जीवन मिशन), ग्रा पं पळसदरी, ता कर्जत -(52 लक्ष )
# मौजे वरणे नळ पाणी योजना करणे (जल जीवन मिशन), ग्रा पं. पळसदरी, ता कर्जत -( 42 लक्ष)








Be First to Comment