Press "Enter" to skip to content

नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

विलास चौलकरांसारख्या एका दमदार कार्यकर्त्याची राजकारणातील नवीन इनिंग सुरु : खा. सुनील तटकरे

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

मध्यवर्ती व निम्न शहर असलेले नागोठणे ही जिल्ह्यातील महत्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून चौलकर यांनी उत्तम काम केले असून तुमच्या नेतृत्वाची चुणूक त्यावेळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे नागोठण्याच्या वैभवात कशाप्रकारे भर घालता येईल हे तुम्हाला माहित आहे. अष्टविनायक पतपेढीच्या माध्यमातूनही अध्यक्ष म्हणून आपण चांगले काम करीत आहात. आमच्यासोबतच्या अडीच वर्षांच्या सानिध्यातून तुमच्यासारखा एक दमदार कार्यकर्ता आज पक्षात सक्रीय होत राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात करीत आहेत याचा मला आनंद आहे. ही इनिंग तुम्ही तुमच्या चौफेर फटकेबाजीने नक्कीच यशस्वी कराल व त्यासाठी लागणारे सर्व पाठबळ या विभागातील, तालुक्यातील सहकारी तुम्हाला देतील असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

नागोठण्याचे माजी सरपंच, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख, रोहा तालुका माजी संघटक व श्री अष्टविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी येथील हॉटेल इंद्रप्रस्थ मधील सभागृहात शुक्रवार दि. २ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यावेळी खा. सुनील तटकरे बोलत होते.

यावेळी इतरही काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, रोहा पं.स.सभापती रामचंद्र सकपाळ, विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, सुरेश मगर, हरीश काळे, कृष्णा धामणे, पांडुरंग गायकर, हिराजी शिंदे, बाळासाहेब टके, मधुकर महाडिक, जुगन जैन, उदय जवके, सचिन कळसकर, संतोष कोळी, विनायक गोळे, मंगेश तेरडे, पप्पू अधिकारी, सुनील लाड, दिनेश घाग, अक्षय नागोठणेकर, अमिता शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चंद्रकांत गायकवाड, संतोष चितळकर, प्रकाश मोरे, नितीन पत्की, महादेवसिंग परदेशी, पांडुरंग नागोठणेकर, रोहिदास हातनोलकर, रवींद्र वाजे, सखाराम ताडकर, रतन हेंडे, दिलीप धाडसे, अशोक भंडारे, नितीन घाग, पंकज चौलकर, सुनील हेंडे, अशोक भोसले, राजेंद्र किंजळे, नरेश जाधव, संदेश जाधव, शेखर जाधव, पांडुरंग चौलकर, मधुकर चौलकर, अनंत चितळकर, किशोर नागोठणेकर, रोहित चौलकर, हेमंत लाड, सुधीर भोसले, विहार हेंडे, प्रभाकर पाटील, दिलीप गायकवाड, पांडुरंग गायकवाड, प्रफुल्ल नागोठणेकर, किसन चाचले, वैभव कामथे, गिरीधर दिवेकर, राजू जांबेकर, इक्बाल नेरेकर, नौशाद शेख, असहद ताक, अब्दुल शेख, साहिल किरकिरे आदींसह अनेकांचा समावेश आहे.

खा. तटकरे पुढे म्हणाले की, संतांची भूमी असलेल्या असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानोबा-तुकोबांनी आपले विचार या भूमीत रुजविले. आषाढी वारीच्या निमित्ताने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थानही आज आळंदीला झाल्याने आजच्या या पवित्री दिवशी विकासाची दिंडी घेत विलासजी चौलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला असल्याने व तुमची काम करण्याची प्रभावी पद्धत पाहता भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी तुमच्या मागे उभा राहील. शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीवर आपण वाटचाल करीत असल्याने भविष्यात सर्वजन एकत्र बसून हितगुज व चर्चा करू असेही खा. तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दीड वर्षापासून आपण सर्वजन कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असतांना या भागात रिलायन्सच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. आता काही दिवसांतच रिलायन्सच्याच सहकार्याने, राज्यसरकार व पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने सुरु होत असेलेले सुसज्ज असे २०० खाटांचे डेडीकेट कोविड सेंटर-हॉस्पिटलचे उद्घाटन फक्त आमच्या हातून होऊदे, त्याचा वापर करण्यासाठी तेथे रुग्ण नको येऊदे अशी प्रार्थना आज मी ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माते चरणी करतो आणि कदाचित जर कोणाला तिथे जावे लागलेच तर त्या रुग्णालयात तो दाखल होऊन तसाच सुखरूप परत आमच्यात येऊन भविष्यातील त्याचे जीवन अधिक समर्पितपणे सुरु करण्याचे काम तेथे होईल असेही खा. तटकरे यांनी स्पष्ट केले. तर एका निरोपावर झालेला हा आजचा कार्यक्रम म्हणजे ठरवून जे करू शकत नाही ते तुम्ही काही तासांतच करून दाखविलेत हीच तुमची खरी ताकद असल्याचे गौरोद्गारही चौलकर यांच्या बद्दल खा. तटकरे यांनी काढले.

विलास चौलकर आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, तटकरे साहेब, ना. आदितीताई व आ. अनिकेतभाई यांच्या लोकाभिमुख कार्याचा धुमधडाका, लोकांत मिसळण्याची तसेच जनसेवेचे कार्य करण्याची त्यांची शैली पाहून माझ्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीवर प्रेम करू लागला. याची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकीत साहेब घरी आले तेव्हा झाली व त्यावेळी मी तटकरे साहेबांचा भक्त झालो. तटकरे साहेबांच्या हस्ते पक्ष प्रवेश हे माझे सौभाग्य असून भविष्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत राहणार असल्याचेही यावेळी चौलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रकांत गायकवाड, प्रकाश मोरे व प्रफुल्ल नागोठणेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी शाहिर अशोक भंडारे यांनी, “झुंझार नेता राष्ट्रवादीचा, हा शिलेदार रायगडचा, नावलौकिक आहे तटकरे साहेबांचा…. हे गीत सदर करून उपस्थितांची दाद मिळविली. त्यांना त्यांचा ६ वर्षीय नातू मित जाधव याने तबला वाजवून सुंदर साथ दिल्याने त्याचेही सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिराजी शिंदे यांनी केले तर आभार रोहिदास हातनोलकर यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.