सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी नजीकच्या देवळोली येथील अनंता नारायण पाटील यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ-2 च्यावतीने कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.
ग्राम स्तरावर पोलिस व जनता यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कामकाज करत असतात.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष उभारणे व तेथील सर्व व्यवस्था पाहणे तसेच सण उत्सवाच्या काळात अहोरात्र परिश्रम घेऊन अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडण्याचे काम पोलिस पाटील करीत असल्याने अनंता पाटील यांना कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.

अनंता नारायण पाटील हे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.याअगोदर त्यांनी रायगड जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम काम केले आहे.तर देवळोली गावचे कर्तबगार पोलिस पाटील म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ-2 कडून कोरोना योध्दाने सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment