सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
उद्योगांना कर्ज माफी आणि सर्व सामान्यांच्या खिशावर डाका असा प्रकार केंद्र सरकारकडून सुरु असून त्याचा निषेध करत आहोत अशी संतप्त भावना माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी व्यक्त केली. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून महागाईविरोधात खालापूर तहसील येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
गॅस ,डिझेल आणि पेट्रोल ची झालेली वाढ यामुळे आधीच कोरोना संसर्गात आर्थिक घडी विस्कटलेला सर्वसामान्यचा बजेट कोलमडलं असून खतांवरील सबसिडी कमी करणे, तौक्ते चक्रीवादळ रायगड च्या वाट्याला आलेली कमी मदत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे .

शनिवारी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलदार यांना लेखी निषेधाचे निवेदन देण्यात आले यावेळी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अधक्ष एच आर पाटील,युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा श्वेता मुलखो, खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, नरेश पाटील, संतोष बैलमारे, मनेष यादव , शेखर पिंगळे, गौरव दिसले सह पदाधिकारी व मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment