Press "Enter" to skip to content

महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारले असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे, त्यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यात हे आंदोलन आज दिनांक 3 जुलै रोजी करण्यात आले होते.

कोरोना चे नियम पाळून कर्जत शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारच्या निषेध म्हणून मोठ्या प्रमाणात फलक बाजी करण्यात आली होती तर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. रंजना धुळे, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण,राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी तालुका अध्यक्ष एकनाथ धुळे, कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष सागर शेळके, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, शरद लाड, आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.